PMPML : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान प्रवाशाच्या खिशातून 32 हजार पळवले

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन ते निगडी गावठाण या (PMPML) मार्गावरून पीएमपीएमएल बसने प्रवास करताना तसेच बसमधून उतरून पायी चालत जाताना एका व्यक्तीच्या खिशातून 32 हजार रुपये नकळत चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 25 मे ) दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या कालावधीत घडली.

राजकुमार रोहिदास वाल्मिकी (वय 37, रा. रामटेकडी, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Car theft Bhosari : कारची काच फोडून कागदपत्रे आणि रोकड चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी दुपारी चिंचवड स्टेशन (PMPML) ते निगडी गावठाण दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत होते. बसमधून उतरल्यानंतर ते काही अंतर चालत गेले. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले कि, त्यांच्या खिशातून 32 हजार रुपये रोख रक्कम असलेला पैशांचा बंडल चोरीला गेला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.