PMPML : डॉ. आंबेडकर जयंती निमित्त उद्या पीएमपीएमएलच्या काही बसमार्गांमध्ये बदल

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त ( PMPML) उद्या (रविवारी) पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच उपनगरांत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यावेळीहोणाऱ्या गर्दीचा विचार करता पीएमपीएमएलतर्फे काही मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

 

 

 

यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड व मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) येथून सुटतील व परतीच्या वेळी बंडगार्डन कडून येताना वाडीया कॉलेज, अलंकार चौक व पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) असे संचलनात राहतील.

 

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

बसमार्गांमधील हा बदल फक्त एका दिवसापुरता राहणार आहे. बसमार्गांमधील बदलाची नोंद प्रवाशी, नागरिक, भाविक व महिला वर्ग यांनी घ्यावी, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले ( PMPML) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.