PMPML Strike : पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप, केवळ 40 टक्के बसेस संचलनात

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी (PMPML Strike) आज (रविवारी) दुपार पासून संप पुकारला आहे. त्यामुळे दुपारपासूनच पीएमपीएमएलची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. केवळ 40 टक्के बसेस या रोडवर धावत आहेत तर 60 टक्के बसेस बंद ठेवण्यात आल्या आहे.
बस पुरवणाऱ्या ठेकेदारांचे तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे मे. ओलेक्ट्रा ग्रीनचटेक लि., मे ईव्ही ट्रान्स प्रा. लि. व मे. ओहा कम्युट प्रा. लि या 4 ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. याचा थेट फटका सामान्य पुणेकरांना बसला आहे. त्यामुळे आज रविवारी संध्याकाळी रस्त्यावर पीएमपीएलची बस संख्या झाली कमी झाली.
रविवार असल्याने शाळा व ऑफिसेस ला सुट्टी आहे मात्र उद्यापर्यंत हा संप सुरूच राहिला तर मात्र नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (PMPML Strike) कारण पीएमपीएमएलची सेवा आता केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरापुरती नाही तर ती लोणावळा, जेजुरी अशा पुणे शहरालगतच्या अनेक छोट्या शहरांनाही जोडते.
संपूर्ण पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएलच्या सर्व कंत्राटी कंपनीच्या बस ठेकेदारांनी अचानक बसेस बंद करण्या बाबत आदेश आपल्या कार्यालयात दिले.
संपामुळे पीएमपीएलच्या 1421 बसेसपैकी केवळ 123 बसेस आज मार्गावर धावल्या.ठेकेदारांचे थकलेले बील आदा करण्यासाठी निधी उपल्ब्ध करून द्यावा यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचं परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.तसेच उद्या मार्गावर 125 बसेस उपल्बध करून देण्यात येणार असून विद्यार्थी व प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.