PMPML : 1600 दिव्यांगांना पीएमपीच्या पासचे वितरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PMPML) समाज विकास विभागाकडून आत्तापर्यंत शहरातील 1600 दिव्यांग बांधवांना पास देण्यात आले आहे. या पाससाठी 31 मे पर्यंत दिव्यांग बांधवांनी अर्ज करावेत, असे आवाहन दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याच अंतर्गत शहरातील दिव्यांग बांधवांना शहर आणि पुण्यात प्रवासासाठी पीएमपीचे मोफत पास देण्यात येतात. शहरात सध्या 8 हजार 400 दिव्यांग आहेत. यापैकी आत्तापर्यंत 1600 दिव्यांगांना पीएमपीच्या मोफत पासचे वितरण करण्यात आले आहे. तर एका पाससाठी महापालिका पीएमपीला 18 हजार रूपये मोजत आहे.

Pune : पुण्यात ऑनलाईन मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानदरांना गंडा घालणारा अटकेत

गतवर्षी दिव्यांगांना पाससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन होती. त्यामुळे 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 2200 दिव्यांगांनी पास घेतले होते. मात्र, 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी (PMPML) महापालिकेने प्रथमच पाससाठी दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक केले आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयातून अर्जाची त्वरीत तपासणी केली जाते. त्यानंतर पीएमपी प्रशासन दिव्यांगांना पास देत आहे. यामुळे दिव्यांगांचा वेळ आणि हेलपाटे वाचत आहेत.

यापूर्वी गरज नसलेले अथवा प्रवास न करणारे दिव्यांगही पास घेत होते, याला ऑनलाइन पद्धतीमुळे आळा बसल्याचा पालिकेचा दावा आहे. तसेच ज्या दिव्यांगांना मोफत पासची आवश्‍यकता आहे, अशांनी 31 मे पूर्वी क्षेत्रीय कार्यालयात जावून मोफत ऑनलाइन अर्ज करून पास घ्यावेत, असे आवाहन दिव्यांग कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.