_MPC_DIR_MPU_III

Bhosari: पीएमपीएलच्या आगार प्रमुखाचा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गौरव 

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या भोसरी आगाराने दिवाळीसना दरम्यान सर्वाधिक उत्पन्न मिळविले. पैशांच्या भरणा करण्यामध्ये भोसरी आगाराचा प्रथम क्रमांक आल्यानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आगार प्रमुख बापू वाघेरे यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच बस चालकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेटचे मोफत वाटप करण्यात आले. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

भोसरीतील बीआरटी बस स्थानक येथे आज (शुक्रवारी)झालेल्या कार्यक्रमाला  हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश गवळी, वाहतूक नियंत्रक धनराज गव्हाणे, विजय आसादे, काळुराम लांडगे, कृष्णाजी सोनवणे आदी उपस्थित होते.

दिवाळीसनात पीएमपीएमएलला मोठे उत्पन्न मिळाले आहे. पीएमपीएलचे 13 आगार आहेत. त्यापैकी भोसरीतील आगाराने सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे. भरणा करण्यामध्ये भोसरी आगाराचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यानिमित्त आगार प्रमुखांचा आमदार लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पीएमपीएमलच्या बस चालकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेटचे मोफत वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.