PMPML : पीएमपीएमएल चालक बस चालवताना पाहतोय चित्रपट? नागरिकांच्या जीवाला धोका?

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये चक्क पीएमपीएमएल (PMPML) चालक बस चालवत असताना चित्रपट पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सदर चालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

पीएमपीएमएलमधील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.या चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल चालकाने तरुणीसोबत गैरवर्तन केल्याची घटनाही समोर आली होती. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Pimpri News : आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

सध्या कोणत्याही वाहनातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. रस्त्यांची  (PMPML) दुरवस्था, गाडीवर अनियंत्रण यामुळे अपघात वाढले आहेत. परंतु, सार्वजनिक रित्या सुरक्षित मानला जाणारा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचा प्रवास देखील नागरिकांसाठी धोकादायक बनत चालला आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.