पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचार्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी २४ कोटी रुपये आगाऊ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या निर्णयाचा पीएमपीएमएलच्या दहा हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. आज या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना काळात अत्यावश्यक सेवा आणि विलगीकरण केंद्रांवर पीएमपीएमएलच्या कर्मचार्यांनी उत्तम सेवा बजावली होती.

रासने पुढे म्हणाले, पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा करणार्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला दहा कोटी रुपये अदा करण्यासाठीही आज स्थायी समितीने मान्यता दिली.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.