Pune : पीएमपीएमएल कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड!

दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस

एमपीसी न्यूज – महापालिका सेवकांप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस देण्याचा निर्णय पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांवर बोनससाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असेही महापौरांनी यावेळी नमूद केले.  

महापालिकेच्या कर्मचार्‍यांप्रमाणे दिवाळीचा बोनस मिळण्यासाठी पीएमपीएमएलच्या कर्मचार्‍यांना दरवर्षी आंदोलन करावे लागते. या आंदोलनानंतर सानुग्रह अनुदान व बोनस देण्याच्या हालचाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून केल्या जातात. पीएमपीएमएल संचालक मंडळाची शनिवारी बैठक झाली.
या बैठकीपूर्वी पीएमपीएमएलच्या कर्मचारी संघटनेने पत्र देऊन दिवाळीपूर्वी अनुदान आणि बोनस देण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या पत्रात देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांच्या बोनसचा मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस कर्मचार्‍यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.