Pune News : बेस्टच्या धर्तीवर पुण्यातही पीएमपीएमएलची एक्स्प्रेस बससेवा

एमपीसी न्यूज : पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांची ‘लाईफलाईन’ असलेल्या पुणे महानगर प्रदेश परिवहन लिमीटेड अर्थात पीएमपीएमएलकडून मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर लांब पल्ल्याच्या परंतु निवडक बसथांब्यांवर थांबत ‘लिमीटेड एक्स्प्रेस बससेवा’ आजपासून (25 डिसेंबर) सुरू करण्यात आली आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 11 मार्गांवर एक्स्प्रेस बसगाड्या धावणार आहेत. पीएमपीएमएलकडून लांब पल्ल्याच्या मार्गांची पुनर्रचना करून मर्यादित स्थानकांचा समावेश असणारी लिमिटेड सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे जी बस ३० ते ४० बस थांब्यावर थांबत असत ती आता फक्त १३ ते १८ थांब्यांवर थांबणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवासातील वेळ वाचणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर 11 मार्गांवर लिमिटेड सेवा म्हणजेच एक्स्प्रेस बसगाड्या धावणार आहेत. त्यासाठी प्रत्येक बस थांब्यावर 13 ते 18 थांबे निश्चित केले आहेत. तसेच या मार्गांवर ई -बस सोडण्यात येणार असून प्रत्येक 30 आणि 60 मिनीटांनी बस धावणार आहे. यासाठी प्रत्येकी 25 रु. ते 50 रु. तिकीट दर असणार आहे.

बस सेवेत सुधारणा करणे आणि अधिक चालना देण्यासाठी ही सेवा पुरविण्यात येणार आहे. प्रामुख्याने प्रवासाचा वेळ वाचणे, इच्छित स्थळी लवकर पोहोचणे आणि सेवेचा वेग वाढविण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सेवेचा उपयोग प्रवाशांना चांगल्या प्रकारे होईल आणि निश्चितच पीएमपीएमएलला देखील त्याचा फायदा होईल, असा विश्वास पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला आहे.

खालील मार्गांवरून धावणार एक्स्प्रेस बससेवा…..

1) कात्रज ते निगडी

2) भेकराई ते NDA गेट

_MPC_DIR_MPU_II

3) भेकराई ते निगडी (2बसेस )

4) भेकराई ते आळंदी

5) भेकराई ते चिंचवड गाव

6) भेकराई ते हिंजवडी फेज 3

7) भेकराई ते कात्रज

8) निगडी ते वाघोली

9) निगडी ते पुणे स्टेशन

10) निगडी ते हिंजवडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.