PMPML : पीएमपीएमएलकडून मनपा – सिप्ला सेंटर – मनपा हा वर्तुळ बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज – म.न.पा. कॉंग्रेस भवन – राहुल पार्क – आदित्य गार्डन सिटी – सिप्ला सेंटर – म.न.पा.कॉंग्रेस भवन असा ( PMPML) वर्तुळ मार्ग शनिवार (दि.2) सुरु करण्यात आला. या बस सेवेमुळे सिप्ला सेंटर भागातील प्रवासी नागरिकांना या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

सिप्ला सेंटर येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते व पुणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून बससेवेचा शुभारंभ करून लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी बाबा धुमाळ, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार बोधाई, पीएमपीएमएलचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर(ऑपरेशन) सतीश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, कोथरूड डेपो मॅनेजर राजेंद्र गाजरे, कोथरूड आगार अभियंता विकास मते यांची प्रमुख उपस्थित होते.

Pune : उत्तम संघटनच देशाला बलशाली बनवेल – सुमित्रा महाजन

मार्ग क्रमांक 80 चा मार्ग म.न.पा. कॉंग्रेस भवन – राहुल पार्क – आदित्य गार्डन सिटी – सिप्ला सेंटर – म.न.पा. कॉंग्रेस भवन असा वर्तुळ मार्ग असणार आहे. सध्या या मार्गावर 1 बसद्वारे साधारणपणे दिवसभरात एकूण 8 खेपा होणार आहेत. मनपा – सिप्ला सेंटर – मनपा या वर्तुळ मार्गावर पहिली बस सकाळी 8.10 वाजता तर शेवटची बस रात्री 10.30 वाजता आहे.

मनपा – सिप्ला सेंटर – मनपा या वर्तुळ बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी ( PMPML) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.