PMPML News: संचलन तुटीपोटी 10 कोटी देणार; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळला (PMPML News) संचलन तुटीपोटी पिंपरी-चिंचवड महापालिका 10 कोटी रुपये देणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 17 कोटी रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्र. 23 मधील क्लोरिनेटर्सची सुधारणा करुन त्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कामी 2 कोटी 37 लाख खर्च अपेक्षित आहे.

Chakan : चाकणमध्ये पोलीस बंदोबस्तात करवाढ हरकतींवर सुनावणीस सुरुवात

पीएमपीएमएलला पुणे महापालिका 60 टक्के आणि (PMPML News) पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के हिस्सा देते. पीएमपीएमएल संस्थेस सन 2021-22 या वर्षातील संचलन तूट रक्कम 10 कोटी रुपये अदा करण्याच्या खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी बैठकीत मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.