PMPML News : लक्ष्मीनारायण मिश्रा पीएमपीएमएलचे नवे अध्यक्ष

एमपीसीन्यूज : राज्य शासनाकडून लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पीएमपीएल नवे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी( दि.9) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मिश्रा हे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र जगताप यांना राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने त्यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.30 ) सोडला होता.

डॉ राजेंद्र जगताप यांनी 24 जुलै 2020 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. 11 महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.

यात पाच रुपयांत पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, पीएमआरडीएच्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा सुरू करून पीएमपीचे उत्पन्न वाढविले. बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या फेज 2 या अंतर्गत ई – बस सेवा सुरू करणे. पुणे विमानतळहून वातानुकूलित ‘अभी’ नावाची बस सेवा सुरू करणे यासह कर्मचारी हिताचे निर्णय घेतल्याने पीएमपीचा त्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ गाजला.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरणार यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.