PMPML News : विकासनगरमध्ये ‘पीएमपी’ बसचे दोनदा उदघाटन; श्रेयवादाची चर्चा

एमपीसीन्यूज : महापालिका प्रभाग क्रमांक 16 मधील किवळे-विकासनगरमध्ये आज, शुक्रवारी निगडी- दत्तनगर या नवीन बसच्या उदघाटनावरून श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळाले. या एकाच बसचे दोनदा उदघाटन करण्यात आले. ही बस सुरु करण्यामागे आमचेच श्रेय असल्याचा दावा दोन्ही बाजूने करण्यात आला. दरम्यान, या नवीन बस सुविधेमुळे दत्तनगर, बापदेवनगर आणि श्रीनगरमधील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

दत्तनगर आणि बापदेव येथील नागरिकांना निगडी- आदर्शनगर बसने प्रवास करण्यासाठी आदर्श नगर किंवा विकासनगरला जावे लागत होते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागत होती. प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिंधीच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाने निगडी -आदर्शनगर या बसचा दत्तनगर पर्यंत विस्तार केला. त्यानुसार या बसचे आज, शुक्रवारी उदघाटन करण्यात आले.

मात्र, या बसचे दोनवेळा उदघाटन झाले. पहिले उदघाटन सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि भाजप नगरसेविका संगिता भोंडवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उद्योजक आनंद चव्हाण, माजी नगरसेवक शेखर ओहाळ, अमीन शेख, शिवसेनेचे राजेंद्र तरस, दत्ता सोनवणे, संदीप काळे, रोहित सरनोबत, अन्वर तांबोळी, गणेश जुनवणे, पियुष चव्हाण, सुजल काळे, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी आदी उपस्थित होते.

त्यानंतर दुसऱ्यांदा सकाळी पावणे अकरा वाजता राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या हस्ते या बसचे उदघाटन झाले. तसेच यावेळी पेढे वाटपही करण्यात आले.

पीएमपीएमएलचे अधिकारी मन्सूर शेख, माजी नगरसेवक अमिन शेख, दीपक चौगुले, देवराज स्वामी, मुर्गेश स्वामी, अंकुश तरस, सिस्टर ग्लॅडिया, सिस्टर जेफीन, विजय मोरे, गणेश जुनवने आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.