PMPML News : चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर पीएमपीएमएल बस सुरु

एमपीसी न्यूज – चाकण, तळेगाव, शिक्रापूर या मार्गावरून प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांच्या मागणीला पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक साद देत चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर या मार्गावर बससेवेला आरंभ केला आहे.

भोसरी आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण यांच्या हस्ते या मार्गावर धावणा-या बसचे शनिवारी (दि. 12) उद्घाटन करण्यात आले. यावेळी डीएमई पाटसुते, वरिष्ठ लिपिक सुनील चव्हाण, विजय राजुडे, ऍंथोनी गॅरेजचे शिळीमकर, अण्णा सावंत, ताठे, कामगार नेते धनंजय गव्हाणे, भोसरी बीआरटी प्रमुख चाकण काळुराम लांडगे, विजय आसादे, श्रीहरी ढाकणे, बाळू गव्हाणे, कुंदन काळे, सैफ पठाण, भरत काळजे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

भोसरी परिसरातून चाकण, तळेगाव, शिक्रापूर या भागातील कंपन्यांमध्ये कामासाठी जाणारा मोठा कामगारवर्ग आहे. तसेच चाकण येथून तळेगाव दाभाडे आणि शिक्रापूर या मार्गावरून प्रवास करणारा देखील मोठा प्रवासी वर्ग आहे. प्रवाशांकडून पीएमपीएमएल प्रशासनाकडे या मार्गवर बस सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येत होत्या.

त्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक साद देत चाकण-तळेगाव दाभाडे आणि चाकण-शिक्रापूर या दोन मार्गावर बससेवा सुरु केली आहे. शनिवारी भोसरी आगारात या मार्गावरील बसचे उद्घाटन करण्यात आले.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. केचना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमपीएमएल प्रशासनाने बससेवा सुरु केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.