_MPC_DIR_MPU_III

PMPML News : ठेकेदारांसाठी 600 इलेक्ट्रिक बस खरेदीचा घाट ; चार्जिंग सेंटर, डेपोसाठी जागाही देणार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात 12 वर्षांच्या करारावर ठेकेदारांकडून 600 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 150 बस खरेदी केल्या जातील. त्यासाठी पुणे महापालिकेकडून 350 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

तसेच संबंधित ठेकेदारांना डेपो आणि चार्जिंग सेंटरसाठी महापालिका जागा देणार असून विजेचे बील मात्र पीएमपी अदा करणार आहे. या सर्व बसवर ठेकेदारांचा ड्रायव्हर आणि पीएमपीचा कंडक्टर असणार आहेत.

12 वर्षांच्या करारनाम्यावर या बसेस 64 रुपये प्रतिकिलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर घेणार आहेत. त्याच्या चार्जिंगसाठी वीजबिलाचा दर महावितरणकडून निश्चित करण्यात येणार आहे. वीजबील पीएमपीएमएल अदा करणार आहेत.

पीएमपीएमएलच्या स्वारगेट मुख्य कार्यालयात खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीएमएलचे अध्यक्ष शंकर पवार, पीएमपीएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ राजेंद्र जगताप यांची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली.

_MPC_DIR_MPU_II

खा.बापट म्हणाले, पुणे शहराची वाढती लोकसंख्या, सार्वजनिक वाहतुकीचा तोटा, इंधनदरवाढ अशा विविध कारणांमुळे पीएमपी तोट्यात सुरू आहे. नागरिकांच्या वाहतुकीच्या सोयीकरीता इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात 600 बसची खरेदी केली जाणार आहे.

केंद्र सरकारकडून प्रत्येक बसमागे 55 लाख रुपये मिळणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 150 बस येतील. सर्व बसेस ठेकेदारी पद्धतीवर चालविल्या जातील. यामुळे प्रदुषणमुक्त स्वस्त बससेवा मिळू शकेल.

सीईओ राजेंद्र जगताप म्हणाले, इलेक्ट्रिक बससेवा भाडेतत्वावर घेतल्या जातील. 12 वर्षांच्या करारानंतर या बस महापालिकेच्या ताब्यात येतील. तत्पुर्वी चार्जिंग सेंटर आणि डेपोसाठी पीएमपी जागा देईल.

परंतु, वीजबील आपल्याला भरावे लागणार आहे. 64 रुपये प्रतिकिलोमीटर दर निश्चित करण्यात आला आहे. एका बसची 1 कोटी 55 लाख रुपये खर्च असून त्यापैकी 55 लाख रुपये केंद्रसरकार देणार आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष रासने म्हणाले, सीएनजी बसमधून मध्य पेठांसह शिवाजीनगर-स्वारगेट दरम्यान 10 रुपयात दिवसभर प्रवास योजना 26 जानेवारीपासून सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात 60 सीएनजी बस सुरू केल्या जातील.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.