PMPML News : सांगवी व सेनापती बापट रोड मार्गे भोसरी टर्मिनल ते कोथरूड डेपो मार्ग करण्यासाठी विद्यार्थ्यांची पीएमपीएमएलकडे मागणी

एमपीसी न्यूज – सांगवी व सेनापती बापट रोड मार्गे भोसरी टर्मिनल ते कोथरूड डेपो अथवा एन.डी.ए गेट असा मार्ग पीएमपीएमएलकडून सुरू करण्यात यावा, अशी मागणी भोसरी (PMPML News) परिसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

भोसरी टर्मिनल येथून पुणे स्टेशन, मनपा भवन, हिंजवडी फेज 3, हडपसर भेकराईनगर, कात्रज, वारजे माळवाडी या मार्गांवर बस धावतात. मात्र, हडपसर सोडल्यास सर्व बसेस या वाकडेवाडी मार्गे संचलनात आहेत. त्यामुळे सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ, औंध, सांगवी परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना 2-3 बस बदलून प्रवास करावा लागतो जे अतिशय वेळखाऊ आहे. तेव्हा भोसरी टर्मिनल येथून कोथरूड डेपो अथवा एन.डी.ए गेट असा थेट मार्ग सुरू करावा असे विनंती करणारे पत्र पी. विद्यार्थ्यांनी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा पीएमपीएमएलचे संचालक शेखर सिंह तसेच भोसरी आगार प्रमुख विजयकुमार मदगे यांना  दिले. अशी माहिती तन्मय डुंबरे, मख्य समन्वयक, उन्मुक्त युवा संगठन (Pimpri News) यांनी दिली.

सदर पत्राद्वारे हा मार्ग पिंपळे गुरव, सांगवी, औंध, विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, नळ स्टॉप अथवा कोकणे चौक, जगताप डेअरी, वाकड फाटा, औंध, विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता मार्गे सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून बाबुराव घोलप महाविद्यालय सांगवी, औंध आयटीआय, पुणे विद्यापीठ, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, सिम्बायोसिस महाविद्यालय, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, विधी महाविद्यालय, एस.एन.डी.टी. महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला याचा लाभ होईल, तसेच त्यांचा वेळ वाचेल. तसेच सद्यस्थितील पीएमपीएमएलद्वारा मार्ग क्र. 275 कोथरूड डेपो ते चतुःश्रंगी पायथा हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. सदर मार्गाचा देखील भोसरीपर्यंत (Pimpri News) विस्तार करता येऊ शकतो.

Pimpri News : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तन्मय डुंबरे म्हणाले, की भोसरी आगार प्रमुख विजयकुमार मदगे तसेच पीएमपीएमएल (PMPML News) अधिकारी यांच्यात झालेल्या प्राथमिक चर्चेत त्यांनी हा मार्ग सुरू करण्यास सकारात्मकता दाखवली आहे. तेव्हा हा मार्ग लवकरात लवकर सुरू होईल (Pimpri News) अशी आशा आहे.

याबाबत भोसरी आगार प्रमुख विजयकुमार मदगे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “349 भोसरी ते सांगवी हा बसमार्ग कोथरूड डेपोपर्यंत वाढवणार आहोत. यासंदर्भात चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सी.एम.डी) यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी मला याबाबत वाहतूक संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे यांच्या बरोबर चर्चा करून वेळापत्रक निश्चित करण्यास सांगितले आहे. वेळापत्रक तयार करण्याचे काम (Pimpri News) चालू असून पुढील 2 ते 3 दिवसात वरपे यांना भेटून वेळा पत्रक निश्चित केले जाईल.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.