PMPML: पीएमपीएमएलने एका दिवसात केली दोन कोटींची कमाई; एका दिवसात 12 लाख 23 हजार प्रवाशांनी केला प्रवास

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर (PMPML)व त्यालगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते.

सोमवारी (दि. 20) मार्गावर 1698 बसेस संचलनात होत्या. जास्त उत्पन्नाच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिवहन महामंडळास सोमवारी एका दिवसात दोन कोटी सहा लाख 31 हजार 945 इतके उत्पन्न मिळाले आहे. सोमवारी 12 लाख 23 हजार 87 प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला.

 

Bhosari: पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

दिपावली सुट्टी संपत असल्याने परगावी (PMPML)गेलेले प्रवासी परतत असल्याने मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये व प्रवाशांना सुरक्षित उत्तम दर्जाची तत्पर बससेवा देण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व अधिका-यांना परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने व सर्व नियोजीत शेड्युल मार्गस्थ करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच महत्वाच्या बसस्थानकावर बससंचलनावर नियंत्रणासाठी व प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आगार व्यवस्थापक यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या.

मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे.

दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ हा प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.