PMPML : पीएमपीएमएल उद्यापासून अकरा मार्गावरील बस सेवा करणार बंद

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव (PMPML) सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पीएमपीएमएल ओळखली जाते. मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्या म्हणजे शनिवार (दि.25) पासून बंद कऱण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Pune Murder Case : लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवले; लग्नाचा तगादा लावताच अल्पवयीन मुलीचा खून

ग्रामीण भागातील एकूण 40 मार्गावर पीएमपीएमएलला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यातील अकरा मार्ग उद्यापासून बंद कऱण्यात येणार असून उर्वरीत 29 मार्गावर सेवा पुर्ववत सुरु राहणार आहे. हे मार्ग कोरोना काळात इतर सर्व वाहतूक बंद झाल्याने सुरु करण्यात आली होती. मात्र, लोकल किंवा इतर वाहतूक सेवा सुरु झाल्याने पीएमपीएमएलला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. उत्पन्नाच्या दुप्पट खर्च होत असल्याने हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बंद असणारे मार्ग पुढील प्रमाणे.

1) 231 स्वारगेट ते काशिंगगांव – PMPML

2) 232 स्वारगेट ते बेलावडे

3) 293 कापूरव्होळ ते सासवड

4) 296 कात्रज सर्पोद्यान ते विंझर

5) 211 सासवड ते उरुळीकांचन

6) 212 हडपसर ते मोरगांव

7) 210 हडपसर ते जेजुरी

8) 227 अ.(बी.आर.टी)मार्केटयार्ड ते खारावडे/लव्हार्डे

9) 137 (बी.आर.टी) वाघोली ते राहुगांव, पारगाव सालु मालू

10) 353 चाकण, आंबेठाण चौक ते शिक्रापूर फाटा

11) 220 सासवड ते यवत

या मार्गावर एसटी महामंडळाची सेवा मार्त्र पुर्ववत सुरु असणार आहे. तर, या बंद झालेल्या बसेस प्रवाश्यांची गरज ओळखता ते पुणे व पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत नियोजीत केल्या आहेत. ते मार्ग पुढील प्रमाणे

1) एच- 9 डेपो कोअर सिटी -हडपसर ते मांजरी बु.

2) 291 कात्रज ते हडपसर

3) 235 (बी.आर.टी) कात्रज ते खराडी

4) 115 (बी.आर.टी) पुणे स्टेशन ते हिंजवडी माण फेज – 3

5) 301 (बी.आर.टी) शेवाळेवाडी ते कात्रज

6) 299 (बी.आर.टी) कात्रज, गुजरवाडी स्टॅण्ड ते भोसरी

7) 57 पुणे स्टेशन ते वडगांव/वेणूताई

8) के-11 डेपो कोअर सिटी कात्रज ते जांभूळवाडी

9) 233 (बी.आर.टी) मार्केटयार्ड ते पौडगांव

10) 324 भोसरी ते हिंजवडी माण फेज – 3

11) 148 ‘अ’ भोसरी ते भेकाराईनगर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.