PMPML : पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडून नाट्य सेवा संघातील कलाकारांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (PMPML) नाट्य सेवा संघाने 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये ‘प्रश्न कायद्याचा आहे’ हे नाटक सादर करून या नाटकासाठी पुरुष व स्त्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. याबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी गुणोत्तर प्राप्त कलाकारांसह पीएमपीएलच्या नाट्य सेवा संघातील सर्व कलाकारांचे अभिनंदन केले आहे.

पीएमपीएलच्या नाट्य सेवा संघाची वाटचाल गेली 28 वर्षे अविरतपणे सुरू आहे. नाट्य सेवा संघाने एकांकिका स्पर्धेपासून सुरुवात करून दोन अंकी नाटक व त्यानंतर महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेत सन 2021-22 पर्यंत रंगमंचावर तब्बल 28 नाटके सादर केलेली आहेत.

व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली अनेक नाटके पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघाने रंगमंचावर सादर केली आहेत. सन 2003-04 मध्ये ‘घरघर’ नाटकाला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळून या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. तर, 2011- 12 मध्ये ‘फॉरमॅट’, 2012-13 मध्ये ‘खेळ’, 2016-17 मध्ये ‘धुवा’ व 2020-21 मध्ये ‘प्रश्न कायद्याचा आहे’ या नाटकांना विभागीय स्तरावर द्वितीय पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. तसेच, 2014-15 मध्ये ‘अधांतर’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले होते.

Pune news : कार रिव्हर्स घेताना एका व्यक्तीला चिरडले; पाच महिन्यानंतर डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल

पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी पीएमपीएमएल नाट्य सेवा संघाने आतापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल पीएमपीएलचे (PMPML) कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य स्पर्धे मध्ये भाग घेणारे विनोद जम्बुकर, दिलीप आंग्रे, उमेश शेंडगे, नितीन पगारे, देविदास धायगुडे, अशोक बोरसे हेमांगी काळे व नाट्य सेवा संघाची धुरा सांभाळणारे राजेंद्र कुमार यादव आदी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी व नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.