PMPML : शेवाळेवाडी ते आळंदी बससेवा सुरू; शेवाळेवाडी आगारातून चार बसेस सुटणार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे (PMPML) शेवाळेवाडी डेपो ते आळंदीपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळी फुलांनी सजवलेल्या पहिल्या दोन बस टाळ-मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा जयघोष करत आळंदीकडे रवाना झाल्या. बससेवेचे उद्घाटन माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, रामदादा शेवाळे, पांडुरंग शेवाळे, आगार व्यवस्थापक सुरेंद्र दांगट यांच्या हस्ते करण्यात आले.

शेजारी डेपो असूनही सोलापूर रोडवरील भाविक व इतर नागरिकांना आळंदी किंवा त्या मार्गाने जाण्यासाठी हडपसर गाडीतळ येथे जावे लागत असल्याची माहिती माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी दिली.

शेवाळेवाडी ते आळंदी बस असावी, अशी आमची मागणी होती. त्यानुसार बस सुरू झाली आहे. येथून देहू रोडला बस मिळावी, अशी मागणी करणार आहोत. या दोन्ही बसेसमुळे भाविकांची चांगली सोय होईल,” असेही ते पुढे म्हणाले.

शेवाळेवाडी आगर व्यवस्थापक सुरेंद्र दांगट म्हणाले, “वरिष्ठांच्या आदेशानुसार शेवाळेवाडी आगारातून आळंदीसाठी बस सुरू करण्यात आली आहे. सध्या या बसच्या सकाळी आणि दुपारी दोन अशा दोन फेऱ्या (PMPML) असतील. प्रवासाचे अंतर 36 किलोमीटर आहे आणि तिकीटाची किंमत 45 रुपये आहे.”

शांताराम शेवाळे, वसंत शेवाळे, सुनील शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, दीपक शेवाळे, संजय कोद्रे, विजय कोद्रे, संभाजी हाके, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, वैशाली हरपळे, रसिका कुंभारकर, दिगंबर शेवाळे, कैलास जैस्वाल, रामेश कोद्रे, रामेश कोद्रे, व्ही. जयप्रकाश शहा, पीएमपीएमएलचे शिवाजी चंद आदी या वेळी उपस्थित होते.

Maharashtra : मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाची शक्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.