PMPML : निगडी ते विश्रांतवाडी बस चालू करा; अमित गोरखे यांची मागणी

एमपीसी न्यूज : – निगडी ते विश्रांतवाडी बस सेवा(PMPML) त्वरीत चालू करण्याची मागणी भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पीएमपीएल व्यवस्थापकांकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील नागरिकांना सध्या निगडी ते विश्रांतवाडी दरम्यान बस सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गोरखे यांनी ही सेवा त्वरीत सुरू करण्याची मागणी केली आहे. निगडी ते विश्रांतवाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागत(PMPML)आहे.

Chinchwad : व्यक्तिमत्त्व सुदृढ ठेवण्यासाठी लवचिकता अंगीकारावी – डॉ. संतोष भावे

निगडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बस सेवा नसल्यामुळे आर्थिक आणि वेळेचा मोठा भार सहन करावा लागतो. ही सेवा त्वरीत सुरू करून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी तसेच कामगारांना त्यांच्या कार्यस्थळी पोहोचण्यासाठी बस सेवेसारखे सार्वजनिक वाहतूक साधन अत्यंत महत्त्वाचे आहे. बस सेवा बंद असल्यामुळे अनेकांना असुविधा होत आहे आणि त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. पीएमपीएल व्यवस्थापनाने आणि महानगरपालिका आयुक्तांनी या मागणीचा विचार करून निगडी ते विश्रांतवाडी बस सेवा त्वरित चालू करावी,असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share