PMPML Bus news: विमानतळावरून सुटणाऱ्या इलेक्ट्रॉनिक एसी बससेवेचे तिकीट दर स्वस्त !

PMPML to Airport AC Bus Tickets affordable.

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पीएमपीएमएल) विमानतळावरून सुटणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वातानुकुलीत बससेवेच्या तिकीटांचे दर कमी करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. आजपासून (ता. 10) या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे.

पीएमपीलने 24 ऑक्‍टोबरपासून लोहगाव विमानतळावरून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच मार्गांवर विशेष बससेवा सुरू केली. त्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वातानुकूलित (एसी) बस उपलब्ध करून दिल्या आहेत.

मात्र, लोहगाव विमानतळावरून 26 ऑक्‍टोबरपासून रात्रीची विमानसेवा एक वर्षासाठी बंद झाली आहे. सध्या फक्त सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान विमानांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे.

26 ऑक्‍टोबरपासून दररोज सरासरी 28 ते 32 विमानांची वाहतूक होत असून, त्यातून सुमारे 9 हजार प्रवाशांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे पीएमपीच्या सेवेला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे.

विमानतळावरून सुटणाऱ्या बससाठी पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी 50, 100, 150 रुपये तिकीट दर निश्‍चित करण्यात आले होते. परंतु प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने हे दर आता 20, 40, 60 ते 180 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.

प्रवाशांकडून अंतरानुसार वीस रुपयांच्या टप्प्यांत तिकीट दर आकारणी होणार असल्याची माहिती पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.