Pune : पीएमपीएमएलला मिळणार 150 इलेक्ट्रिक बसेस

अवजड व सार्वजनिक उद्योग केंद्र सरकार यांचे फेम इंडिया स्कीम अंतर्गत मंजुरी

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळास अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालय केंद्र सरकारच्या फेम इंडिया स्कीम अंतर्गत पीएमपीएमएलला 150 इलेक्ट्रीक बसेस मान्य झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा प्रचार व प्रसार होण्याच्या अनुषंगाने फेम इंडिया स्कीम अंतर्गत इलेक्ट्रिक बस फेज 2 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

या स्कीम अंतर्गत शहरांतर्गत व शहरा शहरामधील वाहतुकीसंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाले होते. फेम इंडिया स्कीम अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस चालना देणेकामी इलेक्ट्रिक बस फेज 2 मध्ये 5595 इलेक्ट्रिक बसेस 64 शहरे तसेच राज्य सरकार उपक्रम व परिवहन महामंडळे यांच्यासाठी शहरांतर्गत व शहरा शहरामधील वाहतूक संचलनासाठी मान्य करण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रिक बस फेज 2 अंतर्गत पुणे परिवहन महामंडळाने प्रस्ताव सादर केलेला होता.

या प्रस्तावामध्ये परिवहन महामंडळाने सद्य स्थितीतील कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेच्या अनुषंगाने ई-बस संचलन, ई-बस चार्जिंग स्टेशन उभारणी याबाबत माहिती सादर केली होती. त्याला अनुसरून परिवहन महामंडळास 150 इलेक्ट्रिक बसेस देण्यास मान्यता आल्याबाबत अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालय केंद्र सरकार यांचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. परिवहन महामंडळास ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत या बसेस उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रतिबस रुपये 55 लाख अनुदान मिळणार आहे. ­

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.