PMPML : पीएमपीएमएलकडून महिलांसाठी 19 मार्गावर धावणार ‘महिला स्पेशल तेजस्विनी बस

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड (PMPML) शहरातील महिला प्रवाशांच्या सोईसाठी 24 महिला स्पेशल बसेसच्या माध्यमातून तेजस्विनी बस सेवा दिली जाणार आहे. ज्यामध्ये पुण्याच्या 19 मार्गावर सोमवारी म्हणजे 28 नोव्हेंबरपासून या बसेस धावणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून शनिवारी (दि.26) देण्यात आली आहे.

या 24 महिला स्पेशल (तेजस्विनी) बसेसना सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल खेपा देऊन उर्वरित खेपा रेग्युलर प्रवाशांसाठी देण्यात आलेल्या होत्या. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरील सर्व महिला स्पेशल (तेजस्विनी) बसेसला सर्व खेपा महिला स्पेशल देण्यात येत असून या महिला स्पेशल बसेसला ‘महिला कंडक्टर’ यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या बसचे मार्ग पुढील प्रमाणे

Talegaon Dabhade : ‘स्वातंत्र्यसमर’ महानाट्याच्या प्रवेशिकांचे आदर्श विद्या मंदिरामध्ये वाटप

1) 19 तेजस्विनी स्वारगेट ते येवलेवाडी

2) 301 तेजस्विनी स्वारगेट ते हडपसर

3) 113 तेजस्विनी अ.ब.चौक ते सांगवी – PMPML

4) 158 तेजस्विनी म.न.पा. भवन ते लोहगांव

5) 99 तेजस्विनी (बी.आर.टी) कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी

6) 24 तेजस्विनी (बी.आर.टी) कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड

7) 103 तेजस्विनी (बी.आर.टी) कात्रज ते कोथरूड डेपो

8) 64 तेजस्विनी हडपसर ते वारजे माळवाडी

9) 111 तेजस्विनी भेकाराईनगर ते म.न.पा. भवन

10) 167 म तेजस्विनी हडपसर ते वाघोली (केसनंद फाटा)

11) 13 तेजस्विनी(बी.आर.टी) अप्पर डेपो ते स्वारगेट

12) 140 तेजस्विनी अप्पर डेपो ते पुणे स्टेशन

13) 155 तेजस्विनी पुणे स्टेशन ते लोहगांव

14) 322 तेजस्विनी (बी.आर.टी) म.न.पा. भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन

15) 348 तेजस्विनी (बी.आर.टी) निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे )

16) 376 तेजस्विनी निगडी ते भोसरी

17) 372 तेजस्विनी निगडी ते हिंजवडी माण –फेज-३ मेगा पोलीस

18) 304 तेजस्विनी चिंचवडगांव ते भोसरी

19) 355 तेजस्विनी चिखली ते डांगे चौक

तरी जास्तीत-जास्त महिला प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.