Pune News : पीएमपीएमएल उभारणार दोन्ही शहरात ई चार्जिंग स्टेशन !

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड (पीएमपीएमएल) तर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी ई बस, कार आणि रिक्षा अशा खासगी वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आगामी डिसेंबर अखेर नव्या 500 ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याशिवाय सध्या पीएमपीच्या 150 ई-बस आहेत. त्यांच्यासाठी चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर आणि निगडी डेपोत व्यवस्था आहे. भविष्याचा विचार करून दोन्ही शहरातील मोक्याच्या जागांवर ई चार्जिंग स्टेशनमध्ये  चार्जिंगची सुविधा वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे.

या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, चार्जिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही महसूल पीएमपीला मिळेल. पीएमपी आगार आणि स्थानकांच्या दहा टक्के जागांत चार्जिंग स्टेशन उभारणार त्यासाठीचा खर्च संबंधित खासगी कंपनी करणार आगारांत दिवसा बस नसतात. त्यामुळे तेथे सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान खासगी वाहने चार्जिंग करून देणार आहोत.

स्टेशन्स उभारण्यासाठी अनेक राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव दाखल काही नव्या स्टार्टअप्सचाही समावेश अशी असेल पुढची वाटचाल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्वारस्य दाखविलेल्या कंपन्यांबरोबर पीएमपीची बैठक होणार असून, त्यात त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे, हे स्पष्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना निविदा भरण्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली जाईल. १ मार्च रोजी निविदा उघडल्या जातील. संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यावर लगेचच चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होऊ शकते.

स्वारगेट, न.ता.वाडी, कोथरूड, हडपसर, कात्रज, पुणे स्टेशन, मार्केट यार्ड, निगडी, भोसरी, पिंपरी, बालेवाडी, भेकराईनगर, शेवाळवाडी;याशिवाय दोन्ही शहरांतील प्रमुख 109 स्थानकांवर ई चार्जिंग स्टेशन उभारणीचे नियोजन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.