PMPML Workers Strike: तीन महिन्याचा पगार थकला; कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन  

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) च्या कर्मचा-यांचा मे, जुन, जुलै महिन्याचा पगार थकल्याने कर्मचा-यांनी (PMPML Workers Strike) आज (बुधवारी) ठेकेदार कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. कर्मचा-यांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

एमपी ग्रुप इंटरप्रायजेसने करार पद्धतीने पीएमपीएलला बस पुरविल्या आहेत. या कंपनीने चालक, ऑफीस स्टाफ, देखभाल विभागातील कामगारांचा तीन महिन्यांचा पगार थकविल्याचा आरोप करत कामगार कंपनीच्या औंध येथील कार्यालयात जमा झाले. त्यांनी कामबंद करत संप पुकारला.  मे, जुन, जुलै  या तीन महिन्याचा  पगार अद्यापही  झाला नाही. एक वर्षांचा पीएफ देण्यात आला नाही.(PMPML Workers Strike) आत्तापर्यंतचा पगार आणि पीएफ द्यावा अशी कामगारांनी मागणी केली. आम्हाला घरभाडे द्यावे लागते. कुटुंब कसे चालवायचे, कंपनी तीन-तीन महिने पगार करत नाही. आम्ही काय करायचे, आमचे पगार करावेत. अन्यथा कामगांराकडून जे होईल. त्याला कंपनी जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.

Mulshi Dam Update : मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्गामध्ये वाढ

देखभाल विभागाचे पर्यवेक्षक रवि फडतरे म्हणाले, ”एमपी ग्रुप इंटरप्रायजेसने तीन महिन्याचा कामगारांचा पगार थकविला आहे. पगार करण्याबाबत वारंवार तारख्या दिल्या जातात.(PMPML Workers Strike) पण, पगार काही दिला जात नाही. त्यामुळे आम्ही आज कामबंद केले. थकलेल्या पगार द्यावा आम्ही लगेच काम सुरु करतो”.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.