Pune News : पीएमपीची ई- बस वाहतूक आघाडीवर, एक कोटी किलोमीटर धाव पूर्ण 

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) 150 ईलेक्ट्रिक बसचा एक कोटी किलोमीटर प्रवास पूर्ण झाला आहे. ई-बसेसची एक कोटी किलोमीटर धाव पूर्ण करणारी राज्यातील तसेच देशातील प्रथम सार्वजनिक वाहतूक संस्था ठरली आहे.

पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार,  जुलै 2021 अखेर सर्व ई-बस गाड्यांची एकूण एक कोटी एक लाख 92 हजार 511 कि.मी. इतकी धाव पूर्ण झाली आहे.  त्यात – नऊ मीटर मिडी ई-बसची : 32 लाख 19 हजार 642 कि.मी. आणि बारा मीटर बीआरटी ई-बसची : 69 लाख 75 हजार 869 कि.मी. धाव झाली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी 2019 मध्ये जीसीसी तत्वावर 9 मीटर 25 नॉन-बीआरटी वातानुकूलित मिडी ई-बस व ऑगस्ट 2019 मध्ये 12 मीटर बीआरटी वातानुकूलित 125 ई-बस अशा एकूण 150 ई-बस दाखल झाल्या आहेत.

पीएमपीमध्ये मार्च 2022 अखेर जीसीसी तत्वावर 12 मीटर बीआरटी वातानुकूलित 500 ई-बस दाखल होणार असून भारतात पुणे पीएमपी 650 इतका सर्वांत मोठा ई- बस ताफा असणारी सार्वजनिक वाहतूक संस्था होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.