PMRDA : मुख्य अभियंत्याला शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (PMRDA) मुख्य अभियंत्याला एकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 16 मार्च रोजी आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात घडली.

याप्रकरणी अशोक मारूतीराव भालकर (वय 55, रा.शिवाजीनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र जगताप (वय 45) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : पिंपरी चिंचवडच्या पाच हॉस्पिटलमध्ये H3N2 रुग्णांसाठी विशेष आयसोलेशन विभाग सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालकर हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहेत. 16 मार्च रोजी त्यांच्या दालनात बैठक सुरू होती. बैठक (PMRDA) संपत असताना मुख्य ठेकेदार कुणाल भोसले यांच्या सोबत आलेला आरोपी रामचंद्र हा परवानगीविना दालनात घुसला. भालकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तुम्हाला बघून घेतो असा आरडाओरडा करून गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.