PMRDA : वाकड येथील अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून कावेरीनगर, वाकड येथील प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

कावेरीनगर, वाकड येथील गट क्रमांक 210 व 208 मधील प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमणावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यामार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून साधारणपणे 42453 चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण (97 कच्चा स्वरूपातील झोपड्या) जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या.

Maharashtra News : वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकारी यांनी या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.