PMRDA: भूखंडाची ई निविदा प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (PMRDA) जाहीर केलेल्या 12 सुविधा भूखंडाची ई निविदा प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
Pune News : वाघापूर ते शिंदवणे मार्ग आजपासून वाहतुकीसाठी बंद
या साठी लिलाव धारकांची ऑनलाईन नाव नोंदणी ( रजीस्ट्रेशन) 5 एप्रिल 2023 पर्यंत करता येईल. या नाव नोंदणी बाबत अथवा ई निविदा प्रक्रिये बाबत कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी लिलाव पुर्व बैठक ( प्रि – बीड मिटींग ) आज सकाळी 11 वाजता प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात तीसरा मजला येथे सह आयुक्त स्नेहल बर्गे यांचे कक्षात होईल. तरी इच्छूक लिलाव धारकांनी सहभागी व्हावे ,असे अवाहन प्राधिकरणाचे (PMRDA) वतीने करण्यात आले आहे.