PMRDA : पेठ क्रमांक 12 मधील पात्र लाभार्थ्यांना 1 जूनपासून मिळणार सदनिकांचा ताबा

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयामार्फत पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पातील  कमी उत्पन्न गट (एलआयजी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील (ईड्ब्ल्यूएस) सदनिकांची ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेचे सर्व हप्ते अदा केले आहेत, अशा लाभार्थ्यांसमवेत आर्टीकल ऑफ अॅग्रीमेंट दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे.

या लाभार्थ्यांना इमारतनिहाय सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा 1 ते 14 जून 2023 दरम्यान देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पीएमआरडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी दिली.

पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात एकूण 52 हेक्‍टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्‍टर क्षेत्रावर हा गृहप्रकल्प साकारला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 4 हजार 883 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 3 हजार 317 तर, अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) 1 हजार 566 सदनिका उभारल्या जात आहे.

ईडब्ल्यूएस सदनिकांचे कार्पेट क्षेत्र प्रत्येकी 317.50 चौरस फूट इतके आहे. तर, 2 बीएचके सदनिकांचे कार्पेट क्षेत्र प्रत्येकी 637.81 चौरस फूट इतके आहे. मार्च-2019 मध्ये या गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले होते. प्रकल्पात प्रत्येकी 11 मजल्याच्या एकूण 45 इमारती उभारण्यात येणार आहेत.

ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेचे सर्व हप्ते अदा केले आहेत, अशा लाभार्थ्यांसमवेत आर्टीकल ऑफ अॅग्रीमेंट दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना 1 ते 14 जून 2023  या कालावधीत सदनिकांचा ताबा देण्यात येणार आहे. पेठ क्रमांक 12 मधील संबंधित मूळ लाभार्थ्यांनी सदनिकेचा ताबा घेण्यासाठी वेळापत्रकानुसार हजर रहावे.

इमारतीमधील 1 ते 6 मजल्यावरील सदनिकाधारकांनी (PMRDA)

सकाळी 9 ते दुपारी या कालावधीमध्ये, 7 ते 11 या मजल्यावरील लाभार्थ्यांनी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य आहे. ताबा घेतेवेळी लाभार्थ्यांनी सदनिकेचे अंतिम वाटप पत्र व आधारकार्डची मूळ प्रत इत्यादी कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

अपरिहार्य कारणास्तव मूळ लाभार्थी हजर राहू शकत नसल्यास सहअर्जदार अथवा कुटुंबातील इतर व्यक्ती सदनिकेचा ताबा घेण्यासाठी हजर राहू शकतात. यासाठी लाभार्थी यांनी सहअर्जदार अथवा कुटुंबातील इतर व्यक्ती यांना सदनिकेचा ताबा घेण्याचे हक्क दिल्याबाबतचे नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र आवश्यक असणार आहे. सहअर्जदार अथवा कुटुंबातील इतर व्यक्ती ताबा घेण्यास येणार असल्यास त्यांनी अशा नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्राची मूळ प्रत व एक छायांकीत प्रत सोबत आणावी.

वेळापत्रकानुसार लाभार्थी हे सदनिकेचा ताबा घेण्यास हजर न राहील्यास अशा लाभार्थ्यांना 14 जून नंतर ताबा देण्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात येईल.

PMRDA : पीएमआरडीएची अनधिकृत रिसॉर्ट, हॉटेलवर धडक कारवाई

सदनिकाधारकांनी वैयक्तिक वीज मीटर सुविधा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पुणे (MSEDCL) यांच्यामार्फत घेणे आवश्यक आहे. यासाठीची आवश्यक प्रक्रीया लाभार्थ्यांना पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वीज मीटर सुविधा उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी सदनिकाधारकांची असणार आहे.

वीज मीटर बसविण्यासाठी सदनिकाधारकाने कनिष्ठ अभियंता,इलेक्ट्रॉनिक्स सदन,भोसरी II MSEDCL च्या भोसरी कार्यालयाशी समन्वय ठेवणे क्रमप्राप्त आहे, असल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.