PMRDA News : पीएमआरडीए क्षेत्रातील 12 सुविधा भूखंडांचे होणार ई-लिलाव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA News) हद्दीत उपलब्ध 12 सुविधा क्षेत्राचे भूखंड 80 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने देण्यासाठी ई लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
त्यासाठी मुळशी तालुक्यातील हिंजवडी मधील 4 , मान मधील 3 , पिरंगुट मधील 2 भूगाव मधील 2 व कासार अंबोली मधील 1 असे एकूण 12 सुविधा भूखंड (Amenity Spaces) 12 एप्रिल रोजी होणा-या ई लिलावाद्वारे हस्तांतरित करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या https://eauction.nic.in या संकेतस्थळावरून 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 5 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल.
CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला मोठं यश! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा
सदर लिलावाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सर्व लिलाव प्रक्रियेची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in ) उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि संपूर्ण लिलाव प्रक्रिया https://eauction.nic.in या संकेतस्थळावरून होईल.
या सर्व भूखंडावर प्राधिकरणाच्या सन 2018 च्या मंजूर विकास नियमावली नुसार विकास प्रयोजन व चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) अनुज्ञेय होईल. त्यासाठी इच्छुक विकासकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग (PMRDA News) घ्यावा असे आवाहन प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.