Pimpri News : शब्दधनच्या वतीने कवी बाबू डिसोजा यांना ‘कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार’

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्यमंचाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध लेखक, कवी, मुक्तपत्रकार बाबू फिलिप डिसोजा यांना ‘कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार’ देण्यात आला. बाबू डिसोजा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार देण्यात आला.

ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांनी बाबू डिसोजा यांना सन्मानित केले. या वेळी पुरुषोत्तम सदाफुले, संस्थेचे कोषाध्यक्ष तानाजी एकोंडे, मनोहर दिवाण, गझलकार रघुनाथ पाटील, निशिकांत गुमास्ते, शामराव सरकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष चव्हाण यांनी केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.