BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रविवारी सरींवर सरी कवीसंमेलन

0
INA_BLW_TITLE

एमपीसी  न्यूज – वर्षा ऋतु आगमन प्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडने रविवार (दि. 14 जुलै )  सरीवर सरी हे कविसंमेलन आयोजित केले आहे.

माजी आमदार व कवी विश्वास गांगुर्डे आणि कला दिग्दर्शक डॉ. भाई बांदकर हे प्रमुख पाहुणे असून या कविसंमेलनात कवी आपापल्या विविध रचना सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रविवार दि. १४ जुलै सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात सभागृह  येथे आयोजित केला आहे. तरी इच्छुकांनी मसाप पिंपरी-चिंचवडशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष राजन लाखे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A1
.