Poladpur : कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Poladpur: landslide in Kashedi Ghat, Mumbai-Goa highway jammed

एमपीसी न्यूज – कशेडी घाटात काल (गुरुवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प होती. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने ट्वीटद्वारे दिली आहे.

पोलादपूर पोलीस आणि एल अँड टी ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू होते. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत दरड बाजूला करण्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे कशेडी घाट वाहतुकीस अजूनही बंद आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.