Pune : वाहनचोरीच्या 60 गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज – वाहनचोरीचे 60 गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. राजू बाबुराव जावळकर (वय 55, रा. खानापूर, ता. हवेली, जी. पुणे), असे या सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्यांना गुन्हा करण्यापासून रोखणे आणि फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम पोलिसांनी राबवली होती. याच मोहिमेअंतर्गत युनिट दोनचे पोलीस कर्मचारी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी तपास पथकातील पोलीस शिपाई अजित फरांदे आणि पोलीस नाईक विशाल भिलारे यांना राजू जावळकर हा स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वारगेट बस स्थानकावर सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.