Pune : अल्पवयीन मुलीला पळविल्या प्रकरणातील फरार आरोपी वर्षभरानंतर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणातील फरार आरोपी तब्बल वर्षभरानंतर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याला सिंधूदुर्ग कणकवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जनता वसाहत येथून एका मजुराने आपल्या मुलीला पळवून नेल्याची फिर्याद दिली होती.

उमेश भिवा वरिसे (वय २८, शिडावणे, कणकवली, सिंधूदुर्ग), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांना नेमके कोणी पळवून नेले हे माहित नसल्याने अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू करून चौकशी सुरू केली. मात्र, वसाहतीतील कोणीही व्यक्ती निघून गेल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आणखी खोलवर तपास करण्यास सुरुवात केली.

यावेळी आरोपी हा काही दिवसांपूर्वी डेक्कन येथे नाश्त्याची गाडी चालवणाऱ्या व जनता वसाहतमध्ये राहणाऱ्या एका छोट्या व्यवसायिकाकडे रोजंदारी वर काम करत होता.व त्याचे घरीच राहत होता. तेथे या दोघांची ओळख झाली असल्याचे पोलिसांना समजले. त्याप्रमाणे त्याच्या मूळगावी जाऊन त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 23 मे पर्यंतची पोलीस कोठडी मिळाली.

या कारवाई मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या नेतृत्वा खाली सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील,पोलीस उपनिरीक्षक प्रणिता हजारे,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी शिंदे,नवनाथ भोसले यांनी कारवाईत सहभाग नोंदवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.