Pune News : अंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण काढण्यावरून पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट, आत्मदहनाचाही प्रयत्न 

एमपीसी न्यूज : आंबिल ओढा परिसरात पोलिस बंदोबस्‍तात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्‍यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पक जाहीर करून पालिकेने आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्‍याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे.

खासगी बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी आंबिल ओढ्याची मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे कट कारस्थान प्रशासन, आधिकारी, स्थानिक लोकप्रतिनीधी करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी नाराज झाले आहेत. या सर्व प्रकारच्या निषेधार्थ बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आत्मदनाचा प्रयत्न केला

कायद्यातील या तरतुदीनुसार आंबिल ओढ्यासारख्या मोठ्या ओढ्यांच्या कडेने महापालिका आणि हद्दीलागतच्या भागात दोन्ही बाजूस ९ मीटर रुंदीचा ग्रीनबेल्ट ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र, आंबिल ओढ्याच्या कडेने नऊ मीटर ग्रीनबेल्ट सोडाच, ओढ्यातच भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची मूळ वहनक्षमता जवळपास साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पक जाहीर केला आहे.

शहर वेगाने विस्तारत असताना या प्रक्रियेत नैसर्गिक नाले व ओहोळ एका मागोमाग एक लुप्त होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. सिमेंट क्रॉक्रिटचे जंगल फोफावत असुन, त्यात नैसर्गिक घटकांची जपवणूक करण्याचे दायित्व लक्षात घेतले गेले नाही.

इतके सारे घडूनही आजही नाले बुजविण्याचे उद्योग थांबले नसल्याचे अधोरेखीत होत आहे. गंभीर बाब म्हणजे, ही किमया एखाद्या बांधकाम व्यावसायिकाप्रमाणे खुद्द महापालिका विकासाच्या नावाखाली करत आहे. यामुळे पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरणे, रस्‍त्‍यांवर पाण्याचे लोट वाहणे प्रकार घडत आहेत. किशोर कांबळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.