Dighi Crime News : येरवडा कारागृहात असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेली पिलावळ पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – खून आणि मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे साथीदार दिघी येथे येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुरुवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजता परांडेनगर, दिघी येथे करण्यात आली.

प्रशांत प्रकाश बुद्रुक (वय 19, रा. दिघीगाव), अभय गजेंद्र खंडागळे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), प्रणव सतीश बारसे (वय 19, रा. आदर्शनगर, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह अनिकेत यादगिरे (रा. दिघी), प्रसाद प्रकाश बुद्रुक (रा. दिघी), अक्षय गायकवाड (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सुंदर गवळी (रा. दिघी) आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंडा विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम वाणी हा खून आणि मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे काही साथीदार परांडेनगर, दिघी येथील बस स्टॉपच्या मागे मैदानात येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचे इतर साथीदार पळून गेले. आरोपींकडून एक तलवार, एक कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 143, भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4, 25, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 (ब), साथरोग नियंत्रण कलम 3, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.