Hinjawadi: मुदतीत फ्लॅट न देणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पैसे घेऊनही ठरलेल्या मुदतीत फ्लॅट न देणार्‍या तीन बांधकाम व्यावसायिकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यावसायिकांनी 15 ग्राहकांकडून 4 कोटी 14 लाख रूपये घेतले आहेत. हा प्रकार हिंजवडी येथील नेरे गावातील दि व्हिलेज रेसिडेन्सी-2 येथे घडला.

प्रतिक ओमप्रकाश आगरवाल (रा. क्रिस्टल गार्डन, पाषाण, पुणे), विनय बोरीकर, किरण कुंभारकर (दोघेही रा. द प्रिस्टीन होराईझन, शिवकृपा कॉम्पलेक्स, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. याप्रकरणी मनविदंरसिंग तीर्थसिंग आनंद (वय 55, रा. औंध) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद यांच्यासह 14 जणांनी नेरे येथील आरोपींच्या दि व्हिलेज रेसिडेन्सी-2 येथे मार्च 2018 मध्ये फ्लॅट बुक करून खरेदीखत केले होते. या फ्लॅटसाठी 15 जणांकडून आरोपींनी 4 कोटी 14 लाख 27 हजार 491 रूपये घेतले. मात्र, ठरलेल्या मुदतीत त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच त्याबदल्यात ठरलेले भाडे देखील दिले नसून त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.