23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Pune Crime News : वारीत घुसलेल्या मोबाईल चोर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – आळंदी ते पंढरपूर पायी निघालेल्या वारी सोहळ्यात चोरी करण्याच्या इराद्याने घुसलेल्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. झारखंड राज्यातील तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Crime News)  ही कारवाई केली. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना लक्ष करण्यासाठी, त्यांच्याजवळील मोबाईल चोरण्यासाठी ही टोळी सक्रिय झाली होती. 

 

संशयित आरोपी सोमरा नगर मोरी, आकाश दिलीप मोरीं आणि चंदन नगर मोरी यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण झारखंडमधील सराईकेला खरसावान जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे 14 लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे एक मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

 

Manobodh by Priya Shende Part 64 : अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला (Pune Crime News)  गेला होता. याच गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना लक्ष करण्यासाठी आणि त्यांना लुटण्यासाठी हे सर्व आरोपी बाहेरील राज्यातून आले असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय आरोपींनी भुसावळ, नागपूर, जळगाव, नाशिक आणि अमरावती जिल्ह्यातूनही मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
spot_img
Latest news
Related news