Chikhali : पोलीस कॉन्स्टेबल 15 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चिखली येथील पोलीस कॉन्स्टेबल 15 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज सोमवारी (दि.3) करण्यात आली. याप्रकरणी एका 51 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.

दिलीप तुकाराम खंदारे (वय 35, रा. भोसरी, पुणे), असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने असमर्थता दर्शवल्याने 15 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. यातील पहिला 10 हजार रुपयांचा हफ्ता भोसले ब्रदर्स पेट्रोल पंप समोर रोड लगत स्वीकारला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.