Pune : तस्करीसाठी 12 लाखांचे मांडूळ आणणारे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – दूर्मिळ होत चाललेले मांडुळ जातीचे सर्प 12 लाखांना विक्रिसाठी स्वामी नारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडवर आलेल्या तिघांना पोलिसांनी काल गुरूवारी (दि.25)ताब्यात घेतले.

याप्रकरणी दिपक रामचंद्र साळुंखे (वय 23, रा. गुळची, पुरंदर) व दोन अल्पवयीन मूलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.24) भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत असताना त्यांना खब-याकडून दोन इसम स्वामी नारायण मंदिराजवळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून स्वामी नारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडवर पोलीस त्यांची वाट पाहत थांबले. तेव्हा त्यांना दोघेजण हातात सॅक घेऊन येताना दिसले. त्यांना आडवून त्याच्याजवळ चैौकशी करून हातातील सॅकची पाहणी केली असता त्यामध्ये काळ्या रंगाचे चार फुट लांब असा 2 किलो वजनाचा मांडुळ जातीचा दुर्मिळ सर्प मिळाला.

मांडुळाबद्दल त्यांच्याजवळ विचारपूस केली असता पिसुळी येथील शेतात सापडला असल्याचे सांगितले. व तो विकण्यासाठी पकडून ठेवला असून तो पुण्यात ग्राहकाच्या शोधात 12 लाखांना विकण्यासाठी आणला असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पकडलेला मांडूळ कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालात यांच्या अनाथालयात ठेवण्यासाठी दिला आहे. महाराष्ट्र व देशभरात मांडूळाची अंधश्रद्धेतून विक्री केली जात असल्याने हा सर्प नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तसेच त्याची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत किंमत अमुल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.