_MPC_DIR_MPU_III

Pune : समलैंगिक जोडीदारावर कोयत्याने वार करणारा पोलीस कोठडीतून फरार

एमपीसी न्युज – समलैंगिक जोडीदारावर कोयत्याने वार करणारा आरोपी शुक्रवार पेठेतील कमलनयन हॉस्पिटलच्या शौचालयाच्या खिडकीतून काल रविवारी(दि 23) रात्री साडेदहाच्या सुमारास पसार झाला. अनुराग कमलेश भाटिया(वय 23 , रा. पाषाण-सुस रोड) असे फरार आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कस्टडीतील आरोपी अनुरागला याला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तपासणी नंतर डॉक्टरांनी दिलेले औषध आणण्यासाठी पोलीस नाईक सातपुते हे गेले असता आरोपीने फिर्यादी राठोड यांना जुलाबाचे कारण सांगून शोौचालयास जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा राठोड हे आरोपीला हॉस्पिटल मधील शौचालयाच घेऊन गेले असता आरोपी भाटिया हा शौचालयातील उघड्या खिडकीतून पळून गेला.
याप्रकरणी पुढील तपास खडक पोलीस करत आहेत

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.