Sangvi News : पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लावल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सांगवी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लावल्याची घटना सोमवारी (दि. 4) दुपारी पाच वाजता नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर घडली. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडू पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक विनायक विठ्ठल डोळस यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने जागेच्या अभावामुळे नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात लावली जातात. या वाहनांना सोमवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास आरोपी बंडू पवार याने आग लावली. या आगीत 31 दुचाकी वाहने जळून खाक झाली. यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत तीन दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.