Talegaon Dabhade News : पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलिसांचा सन्मान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त तळेगाव दाभाडे व्यापारी संघटनेकडून तळेगाव दाभाडे पोलिसांचा सन्मान करण्यात आला. व्यापाऱ्यांनी पोलिसांना गुलाबपुष्प आणि पेन देऊन त्यांचा सत्कार केला. कायम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांप्रति कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

त्याप्रसंगी व्यापारी संघटनेचे किरण ओसवाल म्हणाले की कोरोना काळामध्ये अनेक पोलीस बांधवांची बंदोबस्त झालेली परवड आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे कित्येक महिने रात्रंदिवस ते रोडवर बंदोबस्तासाठी उभे राहून नागरिकांना समुपदेशन तसेच कोरोना विषयी जनजागृती करत होते.

आजचा दिवस हा त्यांचा सन्मानाचा दिवस आहे चांगल्या कामाचे कौतुक व्हायलाच हवे शिवाय व्यापारी बांधवांनी देखील पोलीस बांधवांच्या सहकार्यासाठी आपल्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली तर भविष्यात होणारी एखादा गुन्हा किंवा दुर्घटनाही याचा तपास करणे पोलिसांना सोपे होईल.

त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मतकर यांनी देखील व्यापारी बांधवांना सीसीटीव्ही यंत्रणा विषयी आग्रहाची भूमिका घ्यावी सर्वांनी सहकार्य केल्यास कोणत्यातरी सी सी टी व्ही मध्ये तो संशयीत व्यक्ती किंवा येणारे वाहन आल्यास पुढील एखादा गुन्हा झाल्यास तपास कामासाठी सहकार्य होईल तसेच व्यापारी बांधवांनी दुसऱ्या राज्यातील गाड्या आपल्या भागात आल्या तर  त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे उपनिरिक्षक मतकर, हिवरकर पोलीस तोडकर, गिरीगोसाई, बाबाराजे मुंडे, भालेराव, राजगुरू मॅडम व ग्रामसुरक्षा दलाचे सुरेश शिंदे देखील उपस्थित होते. तसेच व्यापारी आघाडी अध्यक्ष-निर्मल ओसवाल, कार्याध्यक्ष सागर शर्मा,जिल्हा उपाध्यक्ष राकेश ओसवाल, जिल्हा सरचिटणीस विनोद राठोड, शांतीलाल ओसवाल,किरण ओसवाल, जितेंद्र राणावत,केयुरभाई शहा, सृजल सुरेश शिंदे आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.