Pune : दोन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – पुण्यात दोन लाखांची लाच स्विकारणा-या  नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकासह हवालदारास एसीबीच्या पथकाने काल रात्री गुरूवारी (दि.15) स्वारगेट येथील मित्रमंडळ चौकाजवळ रंगेहाथ पकडले आहे.

संजीव खंडेराव आहेर(वय 48, पोलीस हवालदार), राजेश सदाशिव शिरसाठ (वय 48 वर्षे, पोलीस निरीक्षक) असे लाच स्विकारणा-या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 38 वयाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार,  तक्रारदार व त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रोक्लेमेशन काढलेले आहेत. या प्रोक्लेमेशन
मध्ये अटक करण्याची तक्रारदारास धमकी देऊन या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी त्या दोघांनी तक्रारदाराकडे 2 लाखांच्या लाचेची मागणी केली.

या घटनेची तक्रार तक्रारदाराने पुणे लाचलुचपत विभागाकडे केली असता. त्याप्रमाणे या तक्रारीची पडताळणी करून पुणे  चलुचपत विभागाने काल सापळा रचून नेवैद्यम हॉटेल समोर, मित्रमंडळ चौक, पुणे येथे त्या दोघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी पोलीस उपअधिक्षक, दत्तात्रय भापकर,पोलीस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे यांच्या पुणे लाचलुचुत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.