Pune News : नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीची नऊ लाखांनी फसवणूक

एमपीसी न्यूज : मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून पाच मोबाईलधारक व्यक्ती विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक ते नऊ मार्च या कालावधीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या उच्चशिक्षित आहे. त्याची पत्नी पोलीस दलात अधिकारी असून ते मुंबईत कार्यरत आहेत. फिर्यादी महिला आहे मुंबईत नोकरी हवी होती. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याच माहितीच्या आधारे चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवले. त्यानंतर त्यांना विविध कारणे सांगत त्यांच्याकडून बँक खात्यांवर तब्बल 11 लाख 65 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

दरम्यान अनेक दिवस झाले तरी नोकरी मिळत असल्यामुळे फिर्यादी महिलेने आरोपींकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर या सायबर चोरट्यांनी दोन लाख 40 हजार रुपये या महिलेला परत केले. अनेकदा मागूनही उर्वरित पैसे परत न केल्यामुळे फिर्यादी ना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.