Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चायनीज खाद्यपदार्थाची गाडी सुरू करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 26) ही कारवाई केली.

प्रविण वासुदेव मुळूक (वय 36) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारास निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चायनीज गाडी सुरू करायची होती. गाडी सुरू करण्यासाठी व त्यावर कारवाई न करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 22 नोव्हेंबर रोजी याबाबत पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच घेताना पोलिसाला रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्‍त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.