Talegaon Dabhade: घरफोड्या, मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलीस- नागरिक संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर विभागात होणाऱ्या घरफोडी, मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे नागरिक महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिक मंच व यशोधम हौसिंग सोसायटी यांच्या वतीने जनजागृती करण्यासाठी पोलीस अधिकारी व नागरिक यांची संयुक्त बैठक यशवंतनगर येथील यशोधाम हॉलमध्ये झाली.

या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षाविषयक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला मोठ्या संख्येने नागरिकांनी विशेषतः महिलांनीही उपस्थिती लावली.

बैठकीत प्रेरणा महिला मंडळातर्फे राजश्री वाकचौरे, वंदना केमसे तसेच अर्चना काटे यांनी महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. तसेच अनेक नागरिकांनी त्यांना जाणवणाऱ्या समस्या लिखित स्वरूपात सहाय्यक पोलीस निरीक्षक गवारी यांच्याकडे दिल्या व त्यांनी त्या बाबत पोलीस खात्या कडून काय सहकार्य केले जाईल व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.

यशोधम सोसायटी तर्फे अध्यक्ष कृष्णा कारके, मंगेश दळवी तसेच नागरिक मंचतर्फे निरंजन जहागिरदार, वसंत भापकर, रमेश पाटील, मिलिंद देशपांडे जाएन्ट्स ग्रुपचे अॅड. देविदास टिळे यांनी संयोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत भेगडे, वेदांत शास्त्री, राजेश बारणे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.